Search This Blog

Saturday 6 January 2024

जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव तरतूद करणार

 







जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव तरतूद करणार

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

      आगामी वर्षासाठी कार्यान्वयीन यंत्रणांची 819 कोटींची मागणी

 

चंद्रपूर दि. 6 : सन 2023-24 या आर्थिक वर्षात शासनाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी 260 कोटींचा नियतव्यय मंजूर केला असतांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 380 कोटी रुपये मंजूर करून आणण्यात यश आले. त्याप्रमाणे आगामी सन 2024-25 या आर्थिक वर्षासुध्दा हा आकडा 500 कोटींच्या वर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करणार असल्याची ग्वाही राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

नियोजन सभागृह येथे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. बैठकीला खासदार अशोक नेतेआमदार सुधाकर अडबालेअभिजित वंजारीजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सनजिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशीमुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकरसहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.जिल्हा नियोजन अधिकारी राजेश कळमकर यांच्यासह नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

सन 2023-24 साठी शासनाच्या मंजूर नियतव्ययापेक्षा तब्बल 120 कोटींची वाढ जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात आलीअसे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेआगामी आर्थिक वर्षासाठी (सन2024-25) सुध्दा जिल्ह्याला वाढीव निधी मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये चर्चा करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणेकडून तब्बल 819 कोटी 86 लक्ष रुपयांची मागणी नियोजन समितीकडे प्राप्त झाली आहे. या मागणीला अनुसरून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी 517 कोटी 86 लक्ष रुपयांची निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. यात शिक्षणआरोग्यशेतीसिंचनरोजगार या पंचसुत्रीवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुढे ते म्हणालेनवीन अंगणवाडी बांधकामाचा विषय अतिशय गांभिर्याने घेण्याची गरज असून यासाठी चांगले डिझाईन तयार करावे. तसेच अंगणवाडीमध्ये सर्व संगणकीय व्यवस्थामॉनेटरिंग सिस्टीमबांधकामाचा दर्जा उत्तम असणे गरजेचे आहे. सोबतच शौचालयस्वच्छता गृहभोजनकक्षसंरक्षण भिंतपिण्याच्या पाण्याची व्यवस्था याकडे विशेष लक्ष द्यावे. क्रीडांगण विकासासंदर्भात ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवावेत. प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक जीम तयार करून तेथे महिला आणि पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था करावी. सदर काम सहा महिन्यात पूर्ण करण्यासाठी क्रीडा विभागाने लक्ष द्यावे. सोबतच वरोरा स्टेडीयमचे नुतणीकरण आणि चंद्रपूरचे तालुका स्टेडीयम घुग्घुसमध्ये करण्याचे नियोजन करावे.

जिल्ह्यात सीसीटीव्ही बाबत पोलिस विभागाने चंद्रपूरचा स्वतंत्र प्लान तयार करावा. तसेच पब्लिक ॲड्रेस सिस्टीमनाईट व्हिजन कॅमेरा यासंदर्भात सुक्ष्म आराखडा तयार करावा. नवीन पोलिस स्टेशनस्मार्ट सिग्नल याबाबत ‍नियमित पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील खुल्या सार्वजनिक जागांचे संरक्षण करणे अतिशय महत्वाचे असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व खुल्या जमिनीभोवती संरक्षण भिंत बांधावी. त्यासाठी नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रउपकेंद्रग्रामीण रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयजिल्हा सामान्य रुग्णालय येथे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्‍य योजनाआयुष्मान भारत योजना व इतर आरोग्यविषयक योजनांची माहिती होण्यासाठी फलक लावावाअशा सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी राजेश कळमकर यांनी सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

0000000

No comments:

Post a Comment