Search This Blog

Thursday, 13 May 2021

"मीडिया क्षेत्रातील संधी" या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

 

"मीडिया क्षेत्रातील संधी" या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

जिल्हा माहिती अधिकारी साधणार संवाद

उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि.13 मे : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता मिडिया क्षेत्रातील संधी" या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यांकरीता दि. 17 मे 2021 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 या कालावधीत मनीषा सावळे, जिल्हा महिती अधिकारी वर्धा-चंद्रपूर ह्या मार्गदर्शन करणार आहेत. सदर ऑनलाईन मार्गदर्शन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर/वर्धा तथा आदिवासी उमेदवारांकरीता कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात येत आहे.

तरी सर्व उमेदवारांनी स्वत: च्या अॅन्ड्रॉईड मोबाईलवर गुगल-मीट हे अॅप डाऊनलोड करावे तसेच meet.google.com/hcy-rtgy-gxd हि लिंक जॉईन करुन या संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी 07172-270933/252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन चंद्रपूर  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहाय्यक आयुक्त, भैयाजी येरमे यांनी केले आहे..

0 0 0

No comments:

Post a Comment