Search This Blog

Monday 24 May 2021

गत 24 तासात 687 कोरोनामुक्त


गत 24 तासात 687 कोरोनामुक्त,

323 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू

Ø  आतापर्यंत 74,523 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 5,366

चंद्रपूर, दि.24 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 687 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 323 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 81 हजार 278 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 74 हजार 523 झाली आहे. सध्या 5 हजार 366 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 56 हजार 694 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 73 हजार 57 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

 आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील सुमित्रा नगर, तुकुम येथील 56 वर्षीय महिला, दुर्गापूर येथील 84 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 44, 59 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला. राजुरा तालुक्यातील वार्ड नं.-14 येथील 62 वर्षीय पुरुष, गुरुदेव नगर, सास्ती येथील 61 वर्षीय महिला, कडोली येथील 45 वर्षीय पुरुष, पेल्लोरा येथील 60 वर्षीय महिला. भद्रावती तालुक्यातील 58, 65 वर्षीय महिला, 78 वर्षीय पुरुष. सावली तालुक्यातील व्याहाड येथील 61 वर्षीय पुरुष,43 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 60 वर्षीय महिला. सिंदेवाही तालुक्यातील 29 वर्षीय पुरुष. कोरपना तालुक्यातील 46 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला तर वणी-यवतमाळ येथील 60 व 80 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

  जिल्ह्यात आतापर्यंत 1389 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1287, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 36, यवतमाळ 47, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

 आज बाधीत आलेल्या 323 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 130, चंद्रपूर तालुका 17, बल्लारपूर 43, भद्रावती 17, ब्रम्हपुरी 08, नागभिड 04, सिंदेवाही 07, मूल 05, सावली 01, पोंभूर्णा 12, गोंडपिपरी 25, राजूरा 22, चिमूर 05, वरोरा 15, कोरपना 07, जिवती 01 व इतर ठिकाणच्या 04 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

000000

1 comment:

  1. I found this blog informative or very useful for me. I suggest everyone, once you should go through this.

    2DG Anti Covid Drug

    ReplyDelete