Search This Blog

Tuesday 25 May 2021

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि. 25 मे: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दि.27 मे ते 29मे  2021 रोजी चंद्रपूर  जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार,दि.27 मे 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11:30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11:40 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सिंदेवाही, मूल व चिमूर तालुक्यातील जबरान धारकांच्या समस्येबाबत वने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक.

दुपारी 12:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कोविड व म्युकरमायकोसिस संदर्भात आढावा बैठक. दुपारी 1:00 वाजता खरीप हंगामात खते व बी-बियाणे सुरळीत पुरवठा होणेबाबत उत्पादक कंपनी संबंधित अधिकारी व सहकारी संस्था यांच्यासमवेत आढावा बैठक. सायंकाळी 5:00 वाजता चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 7:00 वाजता शासकीय निवासस्थान, रानफुल निवास,पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवार, दि. 28 मे 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता गडचिरोली येथून निलसनी पेठगाव ता.सावली जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10:00 वाजता निलसनी पेठगाव ता. सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट.सकाळी 10:20  वाजता जाम बु. ता. सावली व  सकाळी 10:40 वाजता जाम रैयतवारी ता. सावली येथे सांत्वनपर भेट देतील. सकाळी 11:30 वाजता व्याहाड खुर्द ता. सावली येथे आगमन व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित.

दुपारी 1:30 वाजता व्याहाड खुर्द ता. सावली येथून सिंदेवाहीकडे प्रयाण करतील. दुपारी 2:15 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. दुपारी 2:45 वाजता श्रावण लाॅन,सिंदेवाही येथे काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 6:30 वाजता सिंदेवाही येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 7:30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व मुक्काम राहतील.

शनिवार,दि. 29 मे 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता ब्रह्मपुरी येथून आरमोरी जि.गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सकाळी 10:00 वाजता  आरमोरी जि. गडचिरोली येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11:00 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 4:00 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6:30 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ नागपूर येथे आगमन व मुक्काम.

00000

No comments:

Post a Comment