Search This Blog

Monday 24 May 2021

म्युकरमायकोसिस साथीचा आजार म्हणून घोषित

 म्युकरमायकोसिस साथीचा आजार म्हणून घोषित

आजाराच्या माहितीसाठी नोडल अधिकारी नियुक्त

चंद्रपूर दि. 24 मे : कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने म्युकरमायकोसिस हा आजार साथीचा रोग म्हणून घोषित केलेला आहे.

19 मे 2021 रोजी म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये  करण्यात आलेला असून या आजाराला साथीचे रोग म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे साथीचे रोग नियंत्रण कायद्याचे सर्व नियम या आजाराला लागू राहील.

त्यासोबतच सदर आजाराचे संशयित रुग्ण आणि त्यांच्यावर निदान करणाऱ्या डॉक्टरांनी अथवा रुग्णालयांनी जिल्हा प्रशासनाला न कळविण्यास त्यांचेवर साथरोग नियंत्रण कायदा 1897 अंतर्गत कार्यवाही केल्या जाईल अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.

यावेळी सदर बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुमित भगत उपस्थित होते.

 जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण शासकीय अथवा खाजगी रुग्णालयांमध्ये आढळल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कंट्रोल रूमला त्वरित माहिती कळविणे आवश्यक आहे. तसेच सदर आजाराच्या नियंत्रणासाठी व माहितीसाठी  डॉ. कासटवार व डॉ. मेश्राम या डॉक्टरांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने  म्हणाले की , एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांना म्युकरमायकोसिस या आजाराबाबत सर्जरी करावयाची असल्यास तज्ञ डॉक्टरांची टीम असणे आवश्यक आहे. यामध्ये डोळे सर्जन, ई.एन.टी सर्जन, जनरल सर्जन, न्यूरोसर्जन, डेंटल मॅक्झिलो फेशीयल सर्जन आणि अॅम्फोटेरिसीन- बी मेडिसिन असणे गरजेचे आहे. रुग्णालयाकडे कोणतेही रुग्ण संशयित असेल अथवा निदान झालेले असतील तर त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला सूचित करावे. तसेच mucormycosischandrapur@gmail.com या ई-मेलवर किंवा नोडल अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment