Search This Blog

Wednesday, 19 May 2021

"कोविड-19 आणि आयुर्वेद" प्रशिक्षण व्याख्यानाचे आयोजन

 "कोविड-19 आणि आयुर्वेद" प्रशिक्षण व्याख्यानाचे आयोजन

कोविड प्रतिबंध व कोविड पश्चात गुंतागुंत टाळण्यास आयुर्वेद उपयोगी

चंद्रपूर दि. 19 मे :  जगभरात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून नागरिकांना आयुर्वेद या प्राचीन उपचार पद्धतीचा अवलंब व्हावा यासाठी या महामारीत आपली प्राचीन चिकित्सापध्दती असलेल्या आयुर्वेदाचा कसा उपयोग होवू शकतो. याची माहिती जनसामांन्यापर्यंत पोहोचावी, याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या पुढाकाराने आज दि. 19 मे 2021 रोजी "Ayush for Covid-19 Pandemic"  तसेच Ayurveda for Covid-19 अंतर्गत " गरोदरपणात स्त्रियांनी घ्यावयाची काळजी" या विषयांवर ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या आॅनलाईन कार्यशाळेत महाराष्ट्र आरोग्य मंडळ, पुणेचे संशोधन समन्वयक, डाॅ. प्रणिता जोशी व डाॅ. सुशिल देशमुख  यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेद या शाश्वत शास्रानुसार दिनचर्या व ऋतुचर्येच्या आचरणाव्दारा कोविड सारख्या आजारांवर कशी मात करता येईल याबाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले. तसेच कोविडमुळे होणारे गंभीर आजार किंवा मृत्यु टाळण्याकरिता मानसिक शक्ती व ईच्छाशक्ती वाढविणे कसे शक्य आहे ते सांगीतले.

 या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका, आशास्वयंसेविका उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.राजकुमार गहलोत यांनी प्रास्ताविकपर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शितल राजापुरे-देशमुख, वैद्यकिय अधिकारी डाॅ.प्रिती राजगोपाल, प्र.जिल्हा आयुष अधिकारी डाॅ. मिना मडावी तसेच से.नि.जिल्हा आयुष अधिकारी डाॅ.गजानन राऊत  प्रामुख्याने उपस्थित होते.

0 0 0


No comments:

Post a Comment