Search This Blog

Tuesday 25 May 2021

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत

 कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक

रिक्षा चालकांना आर्थिक मदत

परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा

चंद्रपूर दि. 25 मे : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक सहाय्य म्हणून रु.1500 एवढे अर्थसहाय्य देण्याबाबत दि.7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेले आहे.  सदरचा लाभ हा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेटपणे देण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. यानुसार परवानाधारक रिक्षाचालकांनी www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा असे आवाहन चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,किरण मोरे यांनी केले आहे.

ही आहे प्रक्रिया :

परवानाधारक रिक्षाचालकांना www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येईल. रिक्षाचालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नमूद करावा लागणार आहे. सदर माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल तदनंतर ज्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील त्यांचा लाभ त्वरित संबंधित खात्यावर जमा होणार आहे. सदर ऑनलाईन प्रणालीमध्ये कोणाचेही बँक खाते क्रमांक विचारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अडचण आल्यास या क्रमांकावर साधा संपर्क :

ऑनलाइन अर्ज सादर करतांना वरील प्रणालीबाबत अडचण आल्यास चंद्रपूर,उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या  07172-272555 या  क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे कार्यालयामार्फत कळविण्यात आलेले आहे.

000000

No comments:

Post a Comment