Search This Blog

Wednesday 5 May 2021

जिल्हधिकारी अजय गुल्हाणे यांची विविध कोविड केअर सेंटरला भेट

 



जिल्हधिकारी अजय गुल्हाणे यांची विविध कोविड केअर सेंटरला भेट

बल्लारपूरभिवकुंडजिल्हा स्री रूग्णालय,

आसरा व वन अकादमी मध्ये केली पाहणी

Ø  ऑक्सीजन बेड वाढविण्याचे दिले निर्देश

 चंद्रपूर दि.5 मेजिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यांनी आज चंद्रपूर शहरातील जिल्हा स्री रूग्णालयमहानगरपालीकेच्या आसरा व वन अकादमी येथे तसेच काल बल्लारपूरविसारपूर व कळमना येथील येथील कोविड केअर सेंटरला व रूग्णालयास भेट देवून उपलब्ध आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सदर ठिकाणी कोविड रूग्णांसाठी पुरेसे औषधसाठाजेवणाची व्यवस्था व इतर सुविधांची पाहणी करून रूग्णांना आवश्यक सर्व सुविधा पुरविण्याचे तसेच जिल्हा स्री रूग्णालय व वन अकादमी येथे येथे ऑक्सीजन बेड वाढविण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी यांनी काल  बल्लारपूर तालुक्यातील मौजा भिवकुंड येथिल सामाजीक न्याय विभागाच्या मुलींच्या वस्तीगृह  सुरु असलेले कोविड केअर सेंटर येथे तसेच तालुका क्रिडा संकुलविसापूर व सामाजिक न्याय विभागाचे मुलांचे वस्तीगृह येथील प्रस्तावित कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. तसेच ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर आणि प्राथमिक आरोग्य केंन्द्र कळमना येथील संपुर्ण इमारतीची पाहणी केली व ग्रामिण रुग्णालय येथील प्रस्तावित उपजिल्हा कोविड रुग्णालय (DCHC) च्या संबधाने उपस्थित सर्व अधिकाऱ्यांकडुन माहिती जाणुन घेतली.

यावेळी उपविभागीय अधिकारी संजय डव्हळेतहसिलदार संजय राईंचवारवैद्यकीय अधिक्षक डॉ. गजानन मेश्रामनगरपरिषदेचे मुख्यधिकारी विजय सरनाईकउपविभागीय अभियंता नितीन मुत्तेलवारसंवर्ग विकास अधिकारी किरणकुमार धनवडे व प्रभारी ठाणेदार श्री. मुलाणी हे उपस्थित होते.

.000000

No comments:

Post a Comment