Search This Blog

Monday 10 May 2021

गत 24 तासात 2019 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 2019 कोरोनामुक्त,

691 पॉझिटिव्ह तर 15 मृत्यू

Ø आतापर्यंत 58,618 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 12,684

चंद्रपूर, दि. 10 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 2019 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 691 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 15 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 72 हजार 419 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 58 हजार 618 झाली आहे. सध्या 12 हजार 684 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 14 हजार 259 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 38 हजार 58 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 55 वर्षीय पुरुष, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 55 वर्षीय पुरुष,  वरोरा तालुक्यातील 51 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील 30 वर्षीय महिला. घोटनिबांळा 75 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 55 वर्षीय महिला, गडचांदूर येथील 58 वर्षीय पुरुष. कोरपना तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष. सावली तालुक्यातील 29 व 85 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील कच्चेपार येथील 50 वर्षीय पुरुष, नवेगाव पांडव येथील 39 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु येथील 58 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर येथील 65 वर्षीय पुरुष तर वडसा गडचिरोली येथील 49 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1117 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1031 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 34, भंडारा 10, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 691 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 252, चंद्रपूर तालुका 47 , बल्लारपूर 65, भद्रावती 01, ब्रम्हपुरी 20, नागभिड 17, सिंदेवाही 59, मूल 10, सावली 35, पोंभूर्णा 04, गोंडपिपरी 52, राजूरा 02, चिमूर 33, वरोरा 11, कोरपना 61, जिवती 04 व इतर ठिकाणच्या 18रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

1 comment:

  1. Kal mazi mummi vaccine ghyaial geli asta nurse ni vaccine dili nahi tu govt. Worker ahe ani 45 age above ahe at gunjada post sakhara tah warora dist chandrapur pin code 442906 nurse mjanali ki vaccine Ali nahi ani tya gelya nntr tya nni vaccine dene chalu kele ani tya गावातील लोकांनी असे म्हंटले की आमच्या गावच्या व्यतिरिक्त बाहेरच्या गावातील लोकांना लास द्यायची नाही हे बरोबर आहे का? Tya sister cha sir name ahe chahare. Kai action ghyal tya chyavar ani mi suddha govt. Servent ahe jo ki rajya sima var as aa accountant ahe as he apl govt. Ahe las astani suddh tumi lokanna vapas pathvta ani vaccine ghya mhanta

    ReplyDelete