Search This Blog

Wednesday, 19 May 2021

निवृत्तीवेतनधारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

 निवृत्तीवेतनधारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

चंद्रपूर, दि. 19 मे: जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर यांचेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत कोषागार कार्यालयात सादर केले नाही किंवा बँकेमध्ये प्रमाणपत्राच्या यादीवर स्वाक्षरी केलेली नाही अशा निवृत्तीवेतन धारकांनी संबंधित बँकेमध्ये जाऊन बँकेला पुरविण्यात आलेल्या यादीतील आपल्या नावासमोरील रकान्यात स्वाक्षरी करावी. अथवा बँकेने स्वाक्षरी करून दिलेले प्रमाणपत्र जिल्हा कोषागार कार्यालयाचे संकेतस्थळ to.chandrapur@zillamahakosh.in यावर सादर करावे. जेणेकरून निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन सुरू करणे सोयीचे होईल. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment