Search This Blog

Monday 17 May 2021

गत 24 तासात 1449 कोरोनामुक्त


गत 24 तासात 1449 कोरोनामुक्त,

564 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

Ø  आतापर्यंत 67,675 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 9,189

चंद्रपूर, दि. 17 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1449 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 564 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 78 हजार 139 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 67 हजार 675 झाली आहे. सध्या 9 हजार 189 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 36 हजार 21 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 55 हजार 235 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 50, 52,58,63 व 65 वर्षीय पुरुष, 30 व 55 वर्षीय महिला, पिंपळगाव येथील 50 वर्षीय महिला, दुर्गापूर येथील 71 वर्षीय पुरुष, छोटा नागपूर येथील 52 वर्षीय पुरुष, किटाळी येथील 55 वर्षीय महिला. बल्लारपूर तालुक्यातील संतोषी माता वार्ड येथील 62 व  75 वर्षीय पुरुष. वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील 72 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला.  मूल तालुक्यातील वार्ड नं. 15 येथील 72 वर्षीय महिला, 68 वर्षीय पुरुष. सावली तालुक्यातील 55 वर्षीय पुरूष, सिद्धार्थ वार्ड येथील 62 वर्षीय पुरुष.  ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडी येथील 88 वर्षीय पुरुष, चिंचोली येथील 75 वर्षीय पुरुष.  यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील 60 वर्षीय पुरुष तर झरीजामणी येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1275 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1180 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 42, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 564 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 183, चंद्रपूर तालुका 22, बल्लारपूर 90, भद्रावती 33, ब्रम्हपुरी 15, नागभिड 12, सिंदेवाही 13, मूल 24, सावली 07, पोंभूर्णा 07, गोंडपिपरी 21, राजूरा 31, चिमूर 17, वरोरा 35, कोरपना 40, जिवती 00 व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

No comments:

Post a Comment