Search This Blog

Monday 19 August 2019

कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रात सत्कार व मार्गदर्शन समारंभ


शासनाच्या कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रामुळे नोकरी मिळवता आली : पूजा गरमळे

चंद्रपूरदि. 19 ऑगस्ट: वडील वाढई काम करत असल्याने घरची आर्थिक स्थिती फरशी मजबूत नव्हती. त्यामुळे पैसे भरून स्पर्धा परीक्षांचे क्लासेस लावता येत नव्हते. परंतु शासनाच्या आदिवासी मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन केंद्रातील अनुभवी शिक्षक तसेच अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे मला  नोकरी मिळवता आलीअशी भावना 2017 यावर्षी वर्धा येथे कारागृह पोलीस शिपाई म्हणून रुजू झालेल्या पूजा मधुकर गरमडे यांनी व्यक्त केली. दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हा कौशल्य विभागाच्या कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रातील यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना साडेतीन महिने स्पर्धापरीक्षेविषयी मार्गदर्शनाचे मोफत वर्ग आयोजित केले जातात. तसेच त्यांना प्रतिमहिना एक हजार रुपये मानधनही दिले जाते. अशाच 2015-16 च्या बॅचमधील पूजा गरमडे यांनी प्रशिक्षण घेतले व 2017 च्या पोलिस भरतीमध्ये त्यांची पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली. त्यामुळे तिच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आज प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी तिने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा कौशल्य विभागाच्या कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक भैयाजी येरमे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक  केले तसेच उपस्थित  विद्यार्थ्यांना संबोधित केले .त्यामध्ये त्यांनी  अनुसूचित जमातीच्या  विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन केंद्राचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा व सतत आपली प्रगती करत राहावीअसे आवाहन  केले.
याप्रसंगी उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारेप्रियंका कन्नाके तसेच केंद्रातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत जिवतोडे यांनी तर प्रास्ताविक सचिन सावसाकडे व आभार विजय गराटे यांनी मानले.
000

No comments:

Post a Comment