चंद्रपूर, दि. 19 ऑगस्ट: अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरिता बँकेच्या विविध उत्पादनाची उपभोग करण्याकरिता ग्राहकांना प्रोत्साहित करण्यातसाठी चंद्रपूर येथे बँक ऑफ इंडिया तसेच चंद्रपूर क्षेत्रीय कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व ग्राहकांसाठी ग्राहक संमेलन 14 ऑगस्ट 2019रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक जयेश दाभाडे अग्रणी जिल्हा प्रबंधक एस. एन. झा यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपस्थित ग्राहकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ग्राहकांना बँकेच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली. जिल्ह्यात बँकेच्या 37 शाखा असून 1971 पासून जिल्ह्यातील विकासात बँक अग्रणी भूमिका राबवत आहे. ग्राहकांना बँकेच्या व केंद्र शासनाच्या विविध योजनांची अद्यावत माहिती देण्यात आली. केंद्र शासनाच्या नामांकित योजना जसे प्रधानमंत्री मुद्रा योजना, वित्तीय समायोजन जसे प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच बँकेच्या विविध ठेवी योजना, त्यावर मिळणारे व्याजदर, वरिष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध फायदे व व्याजदर याबद्दल सविस्तर माहिती ग्राहकांना देण्यात आली. केंद्र सरकारच्या डिजिटल धोरणाची पृष्ठभूमी व भविष्यात त्याचा होणारा विस्तार आणि व्यापाबद्दल सांगण्यात आले. त्याचप्रमाणे बँकेच्या विविध डिजिटल उत्पादनाबद्दल जसे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पॉस मशीन, इंटरनेट बँकिंग, पिक कर्ज व अन्य कृषी कार्याकरिता मिळणाऱ्या विविध कर्ज व नवीन अग्री वेल्कम ऑफर बद्दल माहिती देण्यात आली. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाकरिता बँकेच्या विविध योजना, यामध्ये एसएमई वेलकम ऑफर, कॉर्पोरेट वेलकम ऑफर, एसएमई रिक्षा, कॉन्ट्रॅक्टर क्रेडिट लाईन, एसएमई डॉक्टर प्लस, एसएमई ऑटो एक्सप्रेस, एसएमई लिक्विड प्लस, एसएमई एज्युकेशन प्लस, स्टार व्यापार, स्टॅन्ड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, जीएसटी प्लस, स्टार लघु उद्यमी समेकीत लोन, आर्टिझन क्रेडिट कार्ड, प्रियदर्शनी योजना याबद्दल ग्राहकांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात आली व त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. यावेळी बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी तसेच अग्रणी कार्यालयाचे कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment