Search This Blog

Monday 16 August 2021

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा


 पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि.16 ऑगस्ट : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार, दि. 17 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात, चंद्रपूर शहरातील बाबुपेठ उड्डाण पुलाबद्दल आढावा बैठक. दुपारी 12 वाजता वनविभाग चंद्रपूर बाबत आढावा बैठक. दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात, कोळसा वाहतूक व डेपोमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याबाबत आढावा बैठक. दुपारी 1 वाजता वढा तीर्थक्षेत्र विकास कामासंदर्भात आढावा बैठक. दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत आढावा बैठक.

दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात, अंबुजा सिमेंट कंपनीने भूसंपादित केलेली व सार्वजनिक उपयोगासाठी गडचांदूर-राजुरा एक्सप्रेस हायवेला लागून असलेल्या विदर्भ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या बाजूला व समोर भूसंपादित जमीन शासनजमा करण्याबाबत आढावा बैठक. तसेच आदिवासी समाज बांधवांच्या जमिनी अंबुजा सिमेंट प्रकल्पाने हस्तांतरित, भूसंपादित केल्या अशा आदिवासी समाज बांधवांना कायमस्वरूपी नोकरी देण्याबाबत आढावा बैठक.  दुपारी 3 वाजता ब्रह्मपुरी तालुक्यातील पुनर्वसन संदर्भात आढावा बैठक. दुपारी 3.30 वाजता चंद्रपूर शहरातील अनाधिकृत बांधकाम संदर्भात आढावा बैठक.

सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात, ग्रेस सिद्धबली कंपनीतील कामगारांचे वेतन प्रश्नाबाबत  बैठक.  सायंकाळी 4.30 वाजता चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट वरील वाहतुकीची कोंडी संदर्भात आढावा बैठक. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर शहरातील अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामासंदर्भात आढावा बैठक. सायंकाळी 5.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात चंद्रपूर जिल्ह्यातील पांदण रस्त्यांचा आढावा. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment