Search This Blog

Monday, 17 October 2022

जिल्हा कोषागार कार्यालयाचे काम अधिक चांगले व गतिमान - लेखा व कोषागारे सहसंचालक श्रीमती पांडे










जिल्हा कोषागार कार्यालयाचे काम अधिक चांगले व गतिमान

                                                      - लेखा व कोषागारे सहसंचालक श्रीमती पांडे



Ø निवृत्ती वेतनधारक व 90 वर्षावरील निवृत्ती धारकांचा सत्कार सोहळा

चंद्रपूरदि. 17 ऑक्टोबर : निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शन संदर्भात काही समस्या व अडीअडचणी असतात. त्या समस्या कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी  प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयाचे काम अधिक चांगले व गतिमान होण्यास मदत मिळतेअसे प्रतिपादन लेखा व कोषागारे सहसंचालक सुवर्णा पांडे यांनी केले.

जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्ती वेतनधारक व 90 वर्षावरील निवृत्ती धारकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगीकोषागार अधिकारी प्रफुल्ल वडेट्टीवारसहाय्यक संचालक गजानन हिरुळकरनागसेन बागडेश्री. पडीशाळाश्रीमती सेलूकरजिल्हा पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कासुलकरजिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकरसेवानिवृत्त उपकोषागार अधिकारी श्री. चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्रीमती पांडे पुढे म्हणाल्याकोषागार कार्यालयाकडून महिन्याच्या एक तारखेला सर्व बँकांना पेन्शन वितरित केले जाते. पण बँकांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ते पेन्शनधारकांच्या खात्यात वेळेत जमा होऊ शकत नाही. कोषागार कार्यालयाकडून पेन्शनधारकांना एक तारखेला पेन्शन मिळावी, यासाठी या कार्यालयाकडून प्रयत्न केले जाईल असेही त्या म्हणाल्या.

कोषागार कार्यालय इतर विभागाचे हृदय- कोषागार अधिकारी वडेट्टीवार

कोषागार कार्यालय, महाराष्ट्र वित्तीय संरचनेतील महत्त्वाचा दुवा आहे. कोषागार कार्यालयास विविध विभागाची देयके पारित करणे, निवृत्तीवेतनधारकांची पेन्शन देणे या सर्व बाबी करीत असतानांच विकासकामांची देयके सुद्धा कोषागार कार्यालयास पारित करावे लागतात. तसेच इतर विभागांना पैसे पुरविण्याचे काम कोषागार कार्यालय करीत असते. शरीरातील हृदयाप्रमाणे कोषागार कार्यालय इतर विभागाचे हृदय आहे, असे जिल्हा कोषागार अधिकारी प्रफुल्ल वडेट्टीवार म्हणाले.

श्री. वडेट्टीवार पुढे म्हणालेजिल्हा कोषागार व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून निवृत्तीवेतनधारक व 90 वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या  नियमानुसार व संचालनालयाच्या परिपत्रकानुसार दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केल्या जाते. निवृत्तीवेतन ही संकल्पना पारतंत्र्यापासून आली आहे. सन 1908 ब्रिटनमध्ये चार्ल्स यांनी ही संकल्पना आणली. सेवानिवृत्तांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सोय व्हावी म्हणून भारतात सुद्धा ही संकल्पना लागू झाली. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अंतर्गत ज्या योजना आहेतत्याअंतर्गत निवृत्तीवेतनाचे लाभ धारकांना मिळत आहे. सध्या त्यात बदल झाला असून एक नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत आलेल्यांना ही योजना लागू नाही परंतु 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे.

या मेळाव्यामध्ये 90 वर्षावरील 42 जेष्ठ सेवा निवृत्तीधारक पेन्शनचा लाभ घेत असून या निवृत्तीधारकांचा सत्कार करण्यात येणार आहे. कुटुंब निवृत्तीवेतनधारक 705 आहेत. ज्यांच्याकडे वयाचे पुरावे नसल्याने त्यांना लाभ देता आला नाही वयाचे पुरावे असल्यास शासन निर्णयान्वये त्यांना लाभ मिळवून देता येईल. पेन्शन धारकांनी माहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करून बँक शाखेत जाऊन स्वाक्षरी करावी असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संचलन तानाजी पवार तर आभार रश्मी साळवे यांनी मानले. यावेळी 90 वर्षावरील निवृत्तीवेतन धारकांचा लेखा व कोषागारे सहसंचालक श्रीमती पांडे यांच्या हस्ते शालश्रीफळसन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीमती कोंगरेप्रभाकर काळमेघजगन्नाथ साखरकरगोविंदराव वीरुटकरप्रभाकर दाचेवारमहादेव रायपुरेशांताबाई पुल्लावारमहादेवराव रायपुरे आधी सेवानिवृत्ती वेतनधारकांचा समावेश होता.

०००००००

No comments:

Post a Comment