Search This Blog

Monday 10 October 2022

राष्ट्रीय जंतनाशक दिन जिल्हास्तरीय कार्यक्रम



 

राष्ट्रीय जंतनाशक दिन जिल्हास्तरीय कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 10 ऑक्टोबर : राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे आयोजन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष मार्गदर्शनात करण्यात आले. या राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन जनता विद्यालय, दुर्गापूर येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या हस्ते समक्ष मुला-मुलींना गोळया खाऊ घालून पार पडले.

यावेळी दुर्गापूरचे सरपंच प्रज्योत पुणेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, (म.बा.वि.) संग्राम शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोंखडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जनता विदयालयाचे मुख्याध्यापक दिपक मेंढे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्राची नेहुलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी मेश्राम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.पराग जिवतोडे प्रामुख्याने उपस्थित होते.  

राष्ट्रीय जंतनाशक दिन कार्यक्रमाच्या प्रस्ताविकपर मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी भारतात सुदृढ पिढी निर्माण व्हावी, या दृष्टीकोनातून जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येत असतो, याविषयावर सविस्तर मार्गदशन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी वैयक्तीक स्वच्छतेमुळे शक्यतो मुला-मुलींमध्ये ॲनिमिया हा रोग आढळून येतो. त्यामुळे या गोळीचे सेवन केले पाहिजे, असे सांगितले. तर शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोंखडे यांनी सदर मोहिम मुलांना आजार होऊ नये याकरीता जिल्हयातील सर्व शाळा स्तरावरून राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

जिल्हयात 10 ऑक्टोबर रोजी  संस्था स्तरावर, शाळांमध्ये व अंगणवाडी केंद्रात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम व 17 ऑक्टोबर रोजी मॉपअप दिन राबविण्यात येत आहे.  तरी, जंतनाशक मोहिमेचा लाभ जिल्हयातील नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन  यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे संचालन मुर्लीधर नन्नावरे तर आभार दुर्गापूर प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष वाकडे यांनी मानले.

००००००

No comments:

Post a Comment