अंधश्रद्धा व जादुटोणा विरोधी कार्यशाळा
चंद्रपूर, दि. 3 आक्टोबर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालयात अंधश्रद्धा व जादुटोणा विरोधी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर, श्रीमती आसेगांवकर, श्री. सोनडवले तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
ग्रामीण व शहरी भागात मोठया प्रमाणात अंधश्रद्धा वाढत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुद्धा अंधश्रद्धा वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ग्रामीण व शहरी भागात पूर्वी भानामती, जादुटोणा आदी प्रकार होता व आजही काहीसा प्रकार दिसून येते. त्यादृष्टीने समाजातील प्रत्येक नागरीकांनी जागृत होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा व जादुटोणा विरोधी कार्यक्रमाचे आयोजन चिमूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत कळमगाव येथे सुद्धा करण्यात आले. तसेच अंधश्रद्धा निमुर्लन या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.
००००००
No comments:
Post a Comment