Search This Blog

Monday, 3 October 2022

अल्पसंख्यांक समाजातील युवक व युवतींना प्रशिक्षण सत्रासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 

अल्पसंख्यांक समाजातील युवक व युवतींना प्रशिक्षण सत्रासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 3 ऑक्टोबर : अल्पसंख्यांक समाजातील महिला व युवकांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायाचे अल्पमुदतीचे प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत प्राप्त झाल्या आहेत.

त्याअनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर व ब्युटी थेरेपीस्ट प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी, अल्पसंख्यांक समाजातील युवक व युवतींनी या प्रशिक्षण सत्राचा लाभ घ्यावा. प्रशिक्षणास इच्छुक युवक-युवतींनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन ब्रह्मपुरी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या एन. डी. पिसे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment