21 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय उद्योजक विकास कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर या कार्यालयामार्फत दि.21 ऑक्टोबर 2022 रोजी साई सभागृह, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, व्होकार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकर नगर, नागपूर येथे एक दिवसीय “उद्योजक विकास कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास कार्यालयातंर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजातील उद्योजकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाचे उद्योग, स्वयंरोजगाराकरीता असलेल्या योजनांची माहिती तसेच विविध परवाने व प्रमाणपत्रांची आवश्यकता, प्रकल्प अहवाल आणि कर्जप्रकरणे आदी बाबतची माहिती आदिवासी उद्योजक व व्यावसायिकांना मिळावी तसेच त्यांच्याद्वारे उत्पादित उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने दि.21 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत साई सभागृह, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, व्होकार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकर नगर, नागपूर येथे एक दिवसीय उद्योजक विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये उद्योग क्षेत्र तसेच बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांचे उद्योजक विकास या विषयावर व्याख्यान व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
कार्यालयातंर्गत कार्यक्षेत्रात येत असलेल्या चिमूर, वरोरा, भद्रावती, नागभीड व ब्रह्मपुरी या तालुक्यातील आदिवासी उद्योजक तसेच वनधन विकास केंद्र संचालित करणाऱ्या आदिवासी बंधू-भगिनींनी 21 ऑक्टोबर रोजी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment