Search This Blog

Monday 10 October 2022

वैयक्तिक लाभाच्या योजनांची यादी 13 ऑक्टोबरपर्यंत सादर करा

 

वैयक्तिक लाभाच्या योजनांची यादी 13 ऑक्टोबरपर्यंत सादर करा

Ø मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना

चंद्रपूर, दि. 10 ऑक्टोबर : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमार्फत त्यांच्या उत्पन्नाच्या किमान 20 टक्के रकमेतून सन 2022-23 या वित्तीय वर्षात 20 टक्के मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. यात मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर ताडपत्री पुरविणे, मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर समर्सिबल विद्युतपंप पुरवठा करणे, सौर कुंपण (बॅटरी व सौरपॅनल) 90 टक्के अनुदानावर पुरविणे, ग्रामीण भागातील मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर ऑइल इंजिन पुरवठा करणे, मागासवर्गीय महिलांना 90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन, पिकोफॉल मशीन पुरविणे, मागासवर्गीय महिलांना 90 टक्के अनुदानावर आटाचक्की पुरविणे, मागासवर्गीयांना लघुउद्योगासाठी अर्थसहाय्य (ई-रिक्षा झेरॉक्स मशीन इत्यादी) 75 टक्के अनुदानावर पुरविणे तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता हलके वाहन चालक प्रशिक्षण देणे या योजनांचा समावेश आहे.

पंचायतराज संस्थांनी त्यांच्या व उत्पन्नातून 5 टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजनेंतर्गत सन 2022-23 या वित्तीय वर्षात 5 टक्के अपंग कल्याणासाठी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. यामध्ये दिव्यांगांना तीन चाकी सायकल, पांढरी काठी, श्रवणयंत्र इत्यादी वैयक्तिक साहित्य पुरविणे, सिकलसेल, थॅलेसेमिया व हिमोफेलिया आजारग्रस्त रुग्णांना औषध पुरवठा करणे, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे त्यामध्ये पीठ गिरणी रु. 55 हजार, शिलाई मशीन रु. 7,700, झेरॉक्स मशीन रुपये 70 हजार तसेच संगणक व प्रिंटर रुपये 58 हजार इत्यादी. दिव्यांग शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट न लावता अर्थसहाय्य देणे त्यामध्ये शेतीविषयक अवजारे रु. 25 हजार, मोटार पंप रु. 20 हजार, ठिबक सिंचन रु. 80 हजार व बी-बियाणे रु. 10 हजार इत्यादी. दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे यामध्ये शेळीपालन रु. 42 हजार, कुक्कुटपालन रु. 6 हजार, तर दुग्धव्यवसाय रु.43 हजार इत्यादी तसेच दिव्यांग जोडप्यांचा सत्कार व प्रोत्साहनपर अनुदान देणे या योजनांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 181 (अ) प्रमाणे जिल्हा परिषदांना देण्यात येणाऱ्या 7 टक्के वन महसूल अनुदान योजनेअंतर्गत सन 2022-23 या वित्तीय वर्षात वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहे. यात वनविभागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक संरक्षण उपाययोजनेकरीता 90 टक्के अनुदानावर काटेरी तारेचा पुरवठा करणे, वनगावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर एच.डी.पी.ई पाईप पुरविणे, वनगावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर ताडपत्री पुरविणे, तसेच जंगली जनावरांच्या हल्ल्यामध्ये जखमी मृत पावलेल्या तसेच सर्पदंशामुळे मृत पावलेल्या वनगावातील ग्रामस्थांना मदत करणे, जखमी व्यक्तीसाठी रु. 10 हजार मर्यादेत व मृत व्यक्तीसाठी रु. 25 हजार मर्यादेत आदींचा समावेश आहे.

सदर योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 825 ग्रामपंचायती अंतर्गत गावे समाविष्ट आहे. सदर योजना यशस्वी करण्याकरीता पंचायतीने गावांमध्ये व्यापक प्रसिद्धी देणे, गावात जनजागृती करणे तसेच राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या 20 टक्के मागासवर्गीय कल्याणकारी योजना, 5 टक्के दिव्यांग कल्याण योजना व 7 टक्के वन महसूल अनुदान योजना या योजनांचे सन 2022-23 या वित्तीय वर्षाकरिता लाभार्थी निवड करण्याकरीता दि. 15 ऑगस्ट 2022 रोजीच्या ग्रामसभेवर निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी दि. 13 ऑक्टोबर 2022 पर्यंत समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना सादर करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment