महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2022 परिक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 144 लागू
चंद्रपूर, दि. 7 ऑक्टोंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परिक्षा-2022 चंद्रपूर मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 8 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत एकुण 23 उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सदर परीक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंध करण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे, याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमीत केला आहे.
दि. 8 ऑक्टोंबर 2022 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरांतर्गत परीक्षार्थी व्यतिरिक्त 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही. परिक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसर व क्षेत्रांतर्गत सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतूकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परिक्षा-2022 मधील परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतेही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.
या परीक्षा उपकेंद्रांना लागू राहील आदेश:
विद्या विहार हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय तुकूम चंद्रपूर, रफी अहमद किदवाई मेमो. हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय घुटकाळा वार्ड चंद्रपूर, सरदार पटेल महाविद्यालय गंजवार्ड, सेंट मायकेल इंग्लीश स्कूल नगिनाबाग, श्री. साई पॉलीटेक्नीक नागपूर रोड चंद्रपुर, नेहरु विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, महर्षी विद्या मंदीर दाताळा,न्यु इंग्लीश हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेज,लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कुल, आर्ट, कॉमर्स व सायन्स महाविदयालय तुकूम, एफ.ई.एस.गर्ल्स कॉलेज, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय बल्लारपूर रोड, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, एफ.ई.एस.गर्ल्स हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय सिव्हील लाईन चंद्रपूर, चांदा पब्लीक स्कुल, बि.जे.एम.कॉरमेल अकॅडमी तुकूम, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय बाबुपेठ, भवानजीभाई चव्हाण हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुल रोड, जनता महाविद्यालय नागपूर रोड, जनता विद्यालय चंद्रपूर, शांताराम पोटदुखे लॉ कॉलेज ताडोबा रोड, चंद्रपूर या उपकेंद्राला आदेश लागू असणार आहे.
सदर आदेश हा दि. 8 ऑक्टोंबर 2022 रोजी चंद्रपूर मुख्यालयातील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परिक्षा-2022 चे परीक्षा उपकेंद्रावर सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधीत व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.
00000
No comments:
Post a Comment