नागरी हक्क संरक्षण व ॲट्रॉसिटी कायद्याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा
चंद्रपूर, दि. 10 ऑक्टोबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात तसेच समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी व जिल्हा दक्षता नियंत्रण समितीच्या सदस्यांकरीता दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, समाज कल्याण निरीक्षक पूनम आसेगावकर, गणेश खोटे तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यशाळेत उपस्थित जिल्हा दक्षता नियंत्रण समितीच्या सर्व सदस्यांना नागरी हक्क संरक्षण कायदा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989, सुधारित अधिनियम 2015 व 2016 अंतर्गत कायदा व त्यामधील तरतुदीबाबत सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एस. येलकेवार यांनी माहिती दिली तसेच सदर योजना प्रभावीपणे राबविण्याकरीता उपस्थित सर्व सदस्यांना आवाहन केले. तसेच अशा प्रकारच्या ॲट्रॉसिटी ॲक्ट बाबतच्या घटना घडण्यास प्रतिबंध कसा घालता येईल? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
०००००
No comments:
Post a Comment