Search This Blog

Friday, 7 October 2022

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नियोजन समितीबाबत पूर्व आढावा बैठक



 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नियोजन समितीबाबत पूर्व आढावा बैठक  

चंद्रपूर, दि. 7 ऑक्टोबर :  राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली 13 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नियोजन सभागृहात शुक्रवारला पूर्व आढावा बैठक घेतली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी सुनील बावणे आणि चिमूरचे प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, आगामी काळात जिल्ह्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, विधान परिषद शिक्षक मतदार संघाची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. परिणामी संपूर्ण जिल्ह्यातच कमीजास्त प्रमाणात आचारसंहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व यंत्रणानी तात्काळ आपापल्या विभागाचे प्रस्ताव सादर करावे. या महिन्याअखेर संपूर्ण विभागाचे प्रस्ताव येणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळेत प्रशासकीय मान्यता देता येईल. आचारसंहितेच्या काळात नवीन कामांना मंजूरी, नवीन निविदा प्रक्रिया आदी कामे करता येत नाही. त्यामुळे विविध यंत्रणांनी आपले प्रस्ताव वेळेत येतील, याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

तत्पूर्वी 3 जून 2022 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुपालन विषयांवर चर्चा करण्यात आली.

00000

No comments:

Post a Comment