Search This Blog

Thursday, 20 October 2022

छट पूजा महोत्सव उत्साहात संपन्न व्हावा यासाठी शासन पूर्णपणे पाठीशी






छट पूजा महोत्सव उत्साहात संपन्न व्हावा यासाठी शासन पूर्णपणे पाठीशी

Ø सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

Ø भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड नकोनियमांचे करा पालन

मुंबई / चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : निर्जल उपवास आणि सूर्यदेवाची आराधना करून सुख, शांती आणि संपन्नतेची प्रार्थना करणाऱ्या तसेच छट पूजेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याकायदा आणि सुव्यवस्थेचे भान ठेवून सहकार्य करा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. हा महोत्सव उत्साहात संपन्न व्हावा यासाठी शासन आपल्या सोबत आहे, असा विश्वासही त्यांनी दिला.

28 क्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या छट पूजा उत्सवाचा आढावा घेण्यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार आशिष शेलारसांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजयमुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकरजिल्हाधिकारी निधी चौधरीसहायक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलमुंबई मनपाचे अति. आयुक्त संजीव कुमारअमरजीत मिश्रा यांच्यासह पोलिस अधिकारीसांस्कृतिक विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई येथील छट पूजेत सहभागी होणाऱ्या भाविकांना विशेषतः महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या. सुटसुटीत पार्किंग,  प्रकाश व्यवस्थाफिरते स्वच्छता गृहवाहतूक व्यवस्थाआपातकालीन स्थितीत कोस्टल सेफ गार्डजागोजागी सूचना फलककायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त चोख असावा व मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व सूचनांचे पालन व्हावे, असे निर्देश सर्व संबंधित विभागांच्या प्रमुखांना देण्यात आले.

मुंबई शहरात 80 ठिकाणी छट पूजा संपन्न होते. त्यापैकी कुलाबाजुहु यांसारख्या अधिक गर्दीच्या ठिकाणी काळजीपूर्वक व्यवस्था हाताळण्यात याव्या असेही ते म्हणाले. राज्यातील इतर जिल्ह्यात देखील जेथे छट पूजा उत्सव साजरा होतो, तेथेही सुरक्षेची व इतर सर्व काळजी घेण्यासंदर्भात निर्देश दिले जातील, असे श्री. मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले. आमदार आशिष शेलार यांनी देखील बैठकीत सूचना मांडल्या. त्यावर कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्याना सांगण्यात आले.

'हाय टाईडअसल्यास सावध रहा : दरम्यान हवामान खात्याशी सतत संपर्कात राहून या पर्वात समुद्रकिनारी पूजा करणाऱ्या भाविकांनी सावधगिरी बाळगावी. हाय टाईडची स्थिती असल्यास प्रशासन ज्या सूचना देईल त्यांचे पालन करावे, असे आवाहन देखील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

००००००० 

No comments:

Post a Comment