Search This Blog

Thursday, 20 October 2022

संबंधित पालकांनी 'त्या' बालकावर हक्क न दाखविल्यास दत्तक मुक्त घोषित

 संबंधित पालकांनी 'त्या' बालकावर हक्क न दाखविल्यास दत्तक मुक्त घोषित

चंद्रपूर, दि.20 ऑक्टोबर : राजुरा तालुक्यातील माता मंदिर, सोनिया गांधी नगर येथील बालक विजय राकेश सकनारे वय 5 वर्षे दहा 10 महिने या बालकाचे आई-वडील तीन महिन्यापूर्वी त्याला सोडून निघून गेले. बालकाच्या नातेवाईकांनी सदर बालकास त्याचे मोठे वडील यांच्याकडे सोडून दिले. परंतु ,त्याचे मोठे वडील सदर बालकास ठेवण्यास तयार नव्हते. त्यामुळे चाईल्ड लाईन चंद्रपूरच्या मदतीने दि. 6 ऑक्टोबर रोजी बालकाचे मोठे वडील सदर बालकास बालकल्याण समिती समोर उपस्थित होऊन बालकास बालकल्याण समितीकडे सोडले.

बालकल्याण समितीच्या आदेशान्वये त्या बालकाला बालकाचे मोठे वडील व चाईल्ड, चंद्रपूर यांनी महिला विकास मंडळद्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह- दत्तक योजना, चंद्रपूर येथे दाखल केले.

संबंधित बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्या आत बालकल्याण समिती, शासकीय मुलाचे निरीक्षण गृह/ बालगृह, डॉ. राजेंद्र आल्लूरवार बिल्डिंग शास्त्रीनगर किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षद्वारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जुना कलेक्टर बंगला जिल्हा स्टेडियमजवळ अथवा महिला विकास मंडळद्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक योजना डॉ. मुठाळ यांच्या जुन्या दवाखान्याजवळ रामनगर, चंद्रपूर या पत्त्यावर संपर्क साधावा. व सदर बालकाबाबत आपला हक्क दाखवावा. अन्यथा बाल कल्याण समिती त्या बालकास दत्तक मुक्त घोषित करेल, आणि महिला विकास मंडळद्वारा किलबिल संस्था दत्तक देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करेल. याची नोंद संबंधित पालकांनी घ्यावी, असे जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूरद्वारे कळविण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment