Search This Blog

Tuesday 4 October 2022

सेवा पंधरवडा : गांधी जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन

 सेवा पंधरवडा गांधी जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन

चंद्रपूर, दि. 4 ऑक्टोबर : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार महाविद्यालयामार्फत ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये सहायक आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, वसतीगृहातील मुले-मुली, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. रॅलीमध्ये जटपुरा गेट येथील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.

ज्येष्ठ नागरीक दिन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरीकांसाठी कार्य करणाऱ्या संस्था व संस्थेच्या प्रतिनिधींचा सत्कार व मार्गदर्शनाचा कार्यक्रम डेबू सावली वृद्धाश्रम, देवाडा येथे पार पडला. या कार्यक्रमाला सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार महाविद्यालयाचे प्रा. नरेंद्र टिकले, व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राचे मार्गदर्शक प्राध्यापिका डॉ. ममता मडावी, सहायक आयुक्त कार्यालयाचे राजेंद्र बुर्लावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रा. डॉ. ममता मडावी यांनी स्मृतीभंश या आजाराविषयी मार्गदर्शन केले. सहायक आयुक्त कार्यालयाचे राजेंद्र बुर्लावार यांनी ज्येष्ठ नागरीकांकरीता पुढील आयुष्य आनदांने घालविण्यासाठी शासनाने आणि समाजाने सुविधा निर्माण करणे, ज्येष्ठांकरीता आरोग्याविषयक सुविधा, मनोरंजनाची साधने, त्यांना मान सम्मान देणे याबाबत योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. गिरडे तर आभार गणेश खोटे यांनी मानले.

०००००००

No comments:

Post a Comment