Search This Blog

Wednesday, 12 October 2022

14 ते 16 ऑक्टोंबर कालावधीत “नैसर्गिक शेती-तणावमुक्त शेतकरी” या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा

 


14 ते 16 ऑक्टोंबर कालावधीत नैसर्गिक शेती-तणावमुक्त शेतकरी” या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 12 ऑक्टोबर : अखिल भारतीय श्री.गुरुदेव आत्मानुसंधान भू-वैकुंठ, अड्याळ टेकडी, सर्वधर्म लोकसेवा संघटना, ब्रम्हपूरी व कृषि विभाग, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 ते 16 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत अड्याळ टेकडी, ब्रम्हपुरी येथे नैसर्गिक शेती-तणावमुक्त शेतकरी या विषयावर 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेला नरसिंहपूर, मध्यप्रदेश येथील नैसर्गीक शेती तज्ञ मार्गदर्शक, तांराचद बेलजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे.

            पारंपरिक शेतीमध्ये आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत सेंद्रिय शेतीचे मॉडेल मूल्यवृद्धी धर्तीवर विकसित करणे, दीर्घकालीन मातीची सुपीकता वाढविणे, साधनसामुग्री संवर्धन सुनिश्चित करणे, रसायनांचा वापर न करता जैविक अभिक्रियांद्वारे घेतलेल्या सुरक्षित आणि निरोगी अन्नाचा पुरवठा करणे, हवामानातील बदलत्या परिस्थितीनुसार समरस होणे आणि उत्पादन खर्च कमी करणे याकरिता शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे.

तरी, जिल्ह्यातील जास्तीत - जास्त शेतकऱ्यांनी सदर प्रशिक्षण, कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवावा. अधिक माहिती व नोंदणी करण्याकरीता आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्पसंचालक (आत्मा) तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment