Search This Blog

Monday 3 October 2022

धान खरेदीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन


धान खरेदीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

Ø धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीचा कालावधी  15 ऑक्टोबर पर्यंत

चंद्रपूर, दि. 3 आक्टोबर खरीप पणन हंगाम 2022-23 मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून शेतकरी नोंदणी करण्याबाबत शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीचा कालावधी दि. 24 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत निर्धारित करण्यात आला आहे.

तरी, दिलेल्या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, वोटिंग कार्ड, शेतीचा 7/12 उतारा, बँक खाते पासबुक आदी संपूर्ण कागदपत्रांसह खरेदी केंद्रावर जाऊन नियोजित कालावधीत धान व भरड धान्य खरेदीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.

नोंदणी सुरू असलेल्या खरेदी केंद्राची यादी :

सावली तालुक्यातील विविध कार्यकारी सह. संस्था मर्या. सावली, विविध कार्यकारी सह संस्था मर्या. व्याहाड (खुर्द), सेवा सह.संस्था पाथरी व सेवा सह संस्था अंतरगाव, सिंदेवाही तालुक्यातील विविध कार्यकारी सह संस्था नवरगाव, नवरगाव सह. राईस मिल नवरगाव, सेवा सहकारी संस्था मर्यादित रत्नापूर, सिंदेवाही सह भात गिरणी संस्था मर्या. सिंदेवाही व विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित सिंदेवाही. नागभीड तालुक्यातील सहकारी खरेदी विक्री संस्था नागभीड, सेवा सहकारी संस्था मर्या. तळोधी (बा.), श्री. गुरुदेव सहकारी राईस मिल कोर्धा, मुल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुल, राजोली वि.का.सह संस्था मर्या. राजोली,

चिमूर तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा कृषी औ. संघ मर्यादित चिमूर, चिमूर ता. सह. शेतकी खरेदी विक्री संस्था नेरी, ब्रह्मपुरी तालुक्यातील सेवा सहकारी संस्था मर्या.आवळगाव, सेवा सहकारी संस्था मर्या. चौगान, सेवा सहकारी संस्था मर्या. अर्हेर नवरगाव, चंद्रपूर जिल्हा कृषी औ. संघ मर्या. ब्रह्मपुरी, सह खरेदी विक्री संस्था मर्या. ब्रह्मपुरी, चंद्रपूर जिल्हा कृषी औ. संघ मर्यादित ब्रह्मपुरी बरडकीनी, सेवा सहकारी संस्था मर्या. मराळमेंढा, सेवा सहकारी संस्था मर्या. उदापूर, सेवा सहकारी संस्था मर्या. तोरगाव (खुर्द), पोभुंर्णा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पोभुंर्णा, व चंद्रपूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर ही आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या ख्ररेदी  केंद्रांवर जाऊन नोंदणी करावी.

०००००००

No comments:

Post a Comment