सेवा पंधरवडा अंतर्गत कर्मचाऱ्यांची ताणतनाव व्यवस्थापन कार्यशाळा
चंद्रपूर, दि. 3 आक्टोबर: राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने कर्मचारी दिन, ताणतनाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेला समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर, समाजकल्याण निरीक्षक मनोज माकोडे, श्रीमती तन्नीरवार, श्रीमती आसेगांवकर, सहा. लेखाधिकारी राजेंद्र बुर्लावार, वरीष्ठ लिपीक श्री. कोडापे तोच कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कार्य करतांना शारीरिक तथा मानसिक ताण तणाव कसे कमी करावे ? याबाबत सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. बोरकर यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यालयातील सहायक लेखाधिकारी राजेंद्र बुर्लावार यांनी सुद्धा ताण तनाव कमी करण्याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
००००००
No comments:
Post a Comment