9 ऑक्टोबर रोजी सावली येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन
चंद्रपूर, दि. 3 ऑक्टोबर : सावली येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुंबई खंडपीठ नागपूर, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा पालक न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बि. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. 9 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता नवीन न्यायमंदिर इमारत, सावली येथे संपन्न होत आहे, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बि.अग्रवाल यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment