Search This Blog

Friday 14 October 2022

सिंचनाकरीता आसोलामेंढा प्रकल्पाचे पाणी 20 ऑक्टोबरपर्यंतच सोडण्यात येणार

 सिंचनाकरीता आसोलामेंढा प्रकल्पाचे पाणी 20 ऑक्टोबरपर्यंतच सोडण्यात येणार

Ø लाभधारकांनी पिकांसाठी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 14 ऑक्टोबर : आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग क्र.2 सावली या विभागाअंतर्गत आसोलामेंढा प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला सन 2022 च्या खरीप हंगामातील सिंचनाकरीता  ‍दि. 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत आसोलामेंढा प्रकल्पाद्वारे 72.544 दलघमी पाणी सिंचनाकरीता सोडण्यात आले आहे. व सद्यस्थितीत 24.298 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आसोलामेंढा प्रकल्पाचे पाणी सिंचनाकरीता दि. 20 ऑक्टोबर पर्यंतच सोडण्यात येणार आहे.

तरी, आसोलामेंढा लाभक्षेत्रातील लाभधारकांनी आपल्या शेतात 20 ऑक्टोबरपर्यंत पिकाकरीता आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे, जेणेकरुन पुढे पाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे आवाहन आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग क्र.2 सावलीचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment