Search This Blog

Monday 13 December 2021

कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोज अद्याप न घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 




कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोज अद्याप न घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि. 13 डिसेंबर : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून प्रतिबंधात्मक लसीकडे बघितले जाते. मात्र, लसीकरणासंदर्भात शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोज अद्यापही अनेकांनी घेतलेला नाही. त्यामुळे लसीचा दुसरा डोज अद्याप न घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा.अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित जिल्हा टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम ,मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, नगर प्रशासन विभागाचे अजितकुमार डोके तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

मुदत उलटून गेली तरीही अनेकांनी लसीची दुसरी मात्रा घेतलेली नाही. असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, ज्या गावातील नागरिकांचे लसीचे  दोन्ही  डोज शिल्लक आहे, अशा गावांमध्ये नोडल ऑफिसर नेमावे. नियुक्त नोडल ऑफिसरनी डिसेंबर अखेरपर्यंत लसीकरण केंद्राला नियमित भेटी द्याव्यात, केंद्रावर लसीकरण सुरू आहे का याबाबत तपासणी करावी.

नागरिकांमध्ये लसीकरण संदर्भात उदासीनता दिसून येत आहे. त्यामूळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात काय गैरसमज आहे याबाबत माहिती जाणून घ्यावी. सर्व तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी लसीकरणासंदर्भात नियमित आढावा घ्यावा, तसेच दैनंदिन लसीकरणास पात्र लाभार्थ्यांची आकडेवारी अद्ययावत करावी. व त्यानुसार लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. असे ते म्हणाले.

11 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात 14 लक्ष 70 हजार 843 नागरीकांचा पहिला डोस तर 7 लक्ष 80 हजार 289 नागरिकांचे दोन्ही डोस असे एकूण 22 लक्ष 51 हजार 132 डोस देण्यात आले आहेत. जिल्हयात 2 लक्ष 88 हजार  इतका लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामूळे 18 ते 44 वर्ष वयोगटातील बऱ्याच नागरीकांचे लसीकरणाचे पहिला व दुसरा डोस अद्याप शिल्लक असून अशा नागरीकांनी पुढे येऊन लसीकरण करुन घ्यावे. यावेळी जिल्हाधिकारी श्री.गुल्हाने यांनी कोविड लसीकरणाची ग्रामिण भागातील सद्यस्थिती तसेच  तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लाँट, लसीचा उपलब्ध साठा याबाबत माहिती जाणून घेतली.

00000

No comments:

Post a Comment