Search This Blog

Monday 13 December 2021

राष्ट्रीय लोक अदालतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 
राष्ट्रीय लोक अदालतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Ø लोक अदालतीत एकूण 2688 प्रकरणे निकाली

चंद्रपूर दि. 13 डिसेंबर : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता बि. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार 11 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये एकूण 2 हजार 688 प्रकरणे निकाली निघाली असून एकूण 4 कोटी 52 लक्ष 4 हजार 474 इतक्या तडजोड रकमेचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटिगेशन) प्रकरणे ठेवण्यात आली. या लोक अदालतीमध्ये नागरिक, विधिज्ञ, विविध बँका विमा कंपनी, फायनान्स कंपनी यांचे अधिकारी आणि पक्षकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.

आपसी वाद समझोत्याने निकाली काढण्याकरिता चर्चा करून सामंजस्याची भूमिका घेत तडजोडीने वाद मिटविण्यात आले. परिणामतः या लोक अदालतीमध्ये प्रलंबित 1 हजार 13 प्रकरणे आणि दाखल पुर्व 1 हजार 675 प्रकरणे असे एकूण 2688 प्रकरणे एकाच दिवशी निकाली काढण्यात आली.

या लोक अदालतीमध्ये 20 हजार 708 केसेस तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी या लोक अदालतीमध्ये स्पेशल ड्राईव्हमध्ये 1041 प्रकरणांचा यशस्वीरित्या निपटारा करण्यात आला. तत्पूर्वी दि. 8 ते 10 डिसेंबर दरम्यान एकूण 523 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला होता.

या राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या अध्यक्षा कविता बि. अग्रवाल, जिल्हा व सत्र न्यायाधीश वीरेंद्र केदार, एस.एस.अन्सारी, प्रभाकर मोडक, एस.एस.मौदेकर यांचे मार्गदर्शन लाभले तर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) प्रशांत काळे व मुख्य न्यायदंडाधिकारी शिवनाथ काळे यांनी सहकार्य केले.

या लोक अदालतीमध्ये प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस.अन्सारी, प्रभाकर मोडक, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) ए.आर.गुन्नाल, श्री. रामटेके, श्री. शिलार, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती मेटे, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्रीमती भास्कर व एम. के. गोटे, श्री. कुलकर्णी यांनी पॅनेल न्यायाधीश म्हणून यशस्वीपणे काम पाहिले.

या लोक अदालती साठी चंद्रपूर, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे विधिज्ञ, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री. किनगी उपस्थित होते. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्र. अधीक्षक लिपिक राजेश वेरुळकर, लक्ष्मीकांत उराडे, अनुरोध रोघे, पद्माकर सोनकुसरे व परिचर प्रमोद पदलमवार, राकेश चहारे यांनी अथक परिश्रम घेतले.

00000

No comments:

Post a Comment