Search This Blog

Sunday 26 December 2021

कोरोनाचा विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जारी

 

कोरोनाचा विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून  नियमावली जारी

Ø सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मनाई

चंद्रपूर दि. 26 डिसेंबर: कोविड-19 ओमायक्रोन विषाणूच्या पहिला होण्यास प्रतिबंध करण्यासाठी काही प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात निर्बंध लावण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केले आहे. यामध्ये नव्याने काही निर्बंधाचा समावेश केला आहे.

विवाह समारंभ बंद जागेमध्ये आयोजित करतेवेळी किंवा अन्य सामाजिक,राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मेळावे यामध्ये अधिकतम 100  उपस्थितांची मर्यादा पाळण्यात यावी जर असे समारंभ मोकळ्या जागे मध्ये आयोजित होत असल्यास जास्तीत जास्त 250 किंवा त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.

 

वर नमूद केलेल्या कार्यक्रमा व्यतिरिक्त इतर कार्यक्रमाचे आयोजन बंद जागेमध्ये करीत असताना आसनव्यवस्था निश्चित असलेल्या ठिकाणी त्या जागेच्या 50 टक्के क्षमते इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. तसेच बंद जागेमध्ये परंतु आसन व्यवस्था निश्चित नसलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करताना आसन व्यवस्था जागेच्या 25 टक्के क्षमतेइतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.असे कार्यक्रम मोकळ्या जागेमध्ये आयोजित करत असतांना त्या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के पेक्षा अधिक उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

क्रीडा स्पर्धा व सामन्यांचे आयोजन करताना प्रेक्षक क्षमतेच्या अधिकतम 25% उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी. तसेच वरील वर्गवारीत न मोडणाऱ्या इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने सदर बाबत संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणच्या बाबतीतील क्षमता औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर अशा कार्यक्रमासाठी महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपा,आयुक्त तर उर्वरित क्षेत्रासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांना अशी क्षमता ठरविण्याचा व त्या अनुषंगाने परवानगी देण्याचे अधिकार असतील.

रेस्टॉरंट, जिम, स्पा, सिनेमा व नाट्यगृहे तेथील आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेच्या अधीन राहून सुरू ठेवण्यास मुभा राहील. परंतु तेथे एकूण आसन क्षमता व परवानगी देण्यात आलेली 50 टक्के क्षमता याबाबतचे सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावी.

सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मनाई राहील.

या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त इतर सर्व निर्बंध जसे आहेत तसेच लागू राहतील. यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले कोरोना निर्बंध आदेश व मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

कोविड- 19 च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार व अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.

सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दिनांक 25 डिसेंबर 2021 चे 12 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील. असे  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment