Search This Blog

Saturday 4 December 2021

6 डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना जारी

 6 डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना जारी

चंद्रपूर दि.4 डिसेंबर : परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दि. 6 डिसेंबर 2021 रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावयाचा आहे. त्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

ओमिक्राॅन या कोरोना विषाणूच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे.सर्व अनुयायांनी दीक्षाभूमी येथे न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हा तालुके यामध्ये आयोजित करण्यात येत असल्याने त्यासंदर्भात स्थानिक, जिल्हा प्रशासनाने कोविड-19 च्या स्थानिक परिस्थितीचा विचार करून आवश्यक ते सनियंत्रण व उपायोजना कराव्यात व त्यासंबंधीचे आदेश काढावेत.

अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांनी मास्कचा वापर, सॅनीटायझरचा वापर आणि  शारीरिक अंतराचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच कार्यक्रमस्थळी येणाऱ्या अनुयायी यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोज झालेले असणे बंधनकारक राहील.आणि थर्मल स्कॅनिंगच्या तपासणीअंती शरीराचे तापमान सर्व साधारण असेल त्यांनाच सदर कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी परवानगी असेल. अशा आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येऊ नयेत. व सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढू नये. सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 6 डिसेंबर 2021 रोजी करिता लागू राहील. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमूद आहे.

00000

No comments:

Post a Comment