Search This Blog

Friday 10 December 2021

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना


इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना

Ø इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 10 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, चंद्रपूर अंतर्गत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र व्यक्तींसाठी महामंडळामार्फत विविध लाभाच्या योजना राबविण्यात येत आहे.

या आहेत योजना:

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ( रु.10 लक्ष पर्यंत):

या योजनेसाठी महत्तम कर्जमर्यादा हि रुपये 10 लक्षपर्यंत आहे. बँकेने रुपये 10 लक्षपर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या प्रकरणात अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. तर परतफेडीचा कालावधी हा बँक निकषानुसार असेल.

गट कर्ज व्याज परतावा योजना( रुपये 10 ते 50 लक्षपर्यंत):

महामंडळ निकषानुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांचे बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) एलएलपी, एफपीओ अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. तसेच बँकेकडून प्रति गटास कमीत कमी रुपये 10 लक्ष ते जास्तीत जास्त 50 लक्षपर्यंतच्या मंजूर उद्योग उभारणीकरिता कर्ज दिले जाते. मंजूर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल ते कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर जास्तीत-जास्त 12 टक्के व्याजदराच्या आणि रु. 15 लाखाच्या मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्याच्या आधार लिंक बँक खात्यात महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

योजनेचे निकष:

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरिता रुपये 8 लक्षापर्यंत. अर्जदाराने मध्येच नियमित कर्ज परतफेड केली नसल्यास त्या अर्जदारास व्याज परतावा दिला जाणार नाही.

महामंडळाच्या विविध योजनांची माहिती www.msobcfdc.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी सदर योजनांच्या अधिक माहिती करिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन शासकीय दुध डेअरी जवळ, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे प्रत्यक्षपणे किंवा 07172-262420 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक दिपाली मांजरे यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment