Search This Blog

Wednesday 8 December 2021

इतर मागासवर्ग महामंडळाच्या कर्ज योजना

 

इतर मागासवर्ग महामंडळाच्या कर्ज योजना

Ø इतर मागास प्रवर्गातील पात्र व्यक्तींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, चंद्रपूर यांना आर्थिक वर्ष 2021-22 करिता बीज भांडवल योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा या दोन योजनेकरिता उद्दिष्ट निश्चित केले आहे. तसेच महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येणार आहे.

20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना:

बीज भांडवल कर्ज योजनेकरिता महत्तम कर्ज मर्यादा 5 लक्ष रुपयापर्यंत आहे. राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून योजना राबविण्यात येते. लाभार्थी सहभाग 5 टक्के, महामंडळ सहभाग 20 टक्के तर बँक सहभाग 75 टक्के असणार आहे. तर महामंडळ सहभागावर व्याजदर 6 टक्के व परतफेडीचा कालावधी 5 वर्षांपर्यंत राहील.

थेट कर्ज योजना:   

थेट कर्ज योजनेकरिता महत्तम कर्जमर्यादा 1 लक्ष रुपयापर्यंत असून लाभार्थी सहभाग निरंक तर कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्षापर्यंत असणार आहे. नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही तर थकित झालेल्या प्रत्येक हप्त्यावर 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

योजनेचे निकष:

अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदार यांची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरिता रुपये 1 लक्ष असावे. तर कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

महामंडळाच्या विविध योजनांची माहिती www.msobcfdc.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी सदर योजनांच्या अधिक माहिती करिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन शासकीय दुध डेअरी जवळ, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे प्रत्यक्षपणे किंवा 07172-262420 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक दिपाली मांजरे यांनी कळविले आहे. 

00000

No comments:

Post a Comment