Search This Blog

Tuesday 28 December 2021

1 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

 

1 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

Ø 30 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 28 डिसेंबर : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आभासी (ऑनलाइन) पद्धतीने दि. 1 जानेवारी 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या 2 कलांचा समावेश राहणार आहे. लोकगीतासाठी साथ-संगत देणाऱ्यासह जास्तीत जास्त 10 स्पर्धक व लोकनृत्य या स्पर्धामध्ये 20 स्पर्धक सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक व साथसंगत देणा-यांचे वय 15 ते 29 या वयोगटातील असणे आवश्यक आहे. लोकनृत्य सादर करणाऱ्या संघाने पूर्व ध्वनीमुद्रित टेप अथवा रेकॉर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही. तसेच लोकगीत सादर करणाऱ्या संघाचे गीत लोकनृत्य चित्रपट बाह्य असावे.

स्पर्धेसाठी प्रवेशिका दि. 30 डिसेंबर 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे वयाच्या दाखल्यासह सादर करावे. त्यानंतर येणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही. तसेच वेळेवर कोणत्याही संघास व कलाकारास स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

युवा महोत्सवाच्या अधिक माहितीकरिता कार्यालयातील आर. बी. वडते 9975591175, विजय डोबाळे 9545858975 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment