Search This Blog

Saturday 25 December 2021

शनिवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 1 बाधित

 

शनिवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 5

चंद्रपूर, दि. 25 डिसेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये  चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात  1 रुग्ण आढळला असून  चंद्रपूर, बल्लारपूर,भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा,  कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 882 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 334 झाली आहे. सध्या 5 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 92 हजार 904 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 2 हजार 736 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment