Search This Blog

Sunday 5 December 2021

पालकमंत्री वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

 


पालकमंत्री वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूर दि. 5 डिसेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार, दि. 6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता एमआयडीसी, मुल येथे आगमन व औद्योगिक परिसराची पाहणी. सकाळी 11:45 वाजता घुगुस येथे आगमन व ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 12:45 वाजता चंद्रपूर येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात ओमिक्राॅन संदर्भात करावयाच्या नियोजनाबाबत बैठक.

दुपारी 1:15 वाजता खनिज विकास प्रतिष्ठान व जिल्हा नियोजन समितीचा आढावा. दुपारी 1:45 वाजताचा वेळ राखीव. दुपारी 2:15 वाजता ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भात मोहरली-कोलारा-पांगरी येथे पर्यटकांकरिता फॅसिलिटेशन केंद्र तयार करणे व  सावली येथील कार्पेट क्लस्टर बाबत  बैठक. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे असोलामेंढा प्रकल्प सावली व वढा तीर्थक्षेत्र येथे पर्यटकांच्या दृष्टीने परिसराच्या विकासाबाबत बैठक. दुपारी 3:45 वाजता चंद्रपूर शहरातील वाढत्या प्रदूषणावर करावयाची उपाययोजना व इरई नदीचे सौंदर्यीकरण, पर्यावरणबाबत बैठक. दुपारी 4 वाजता अनुकंपा धारकांच्या समस्याबाबत आढावा बैठक. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून गडचिरोली कडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment