Search This Blog

Wednesday 8 December 2021

आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 30 धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी सुरु

 


आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 30 धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी सुरु

Ø धान खरेदीला 31 जानेवारी 2022 पर्यंत मान्यता

Ø  शेतकऱ्यांचे पैसे देण्यास सुरवात

चंद्रपूर दि. 8 डिसेंबर : खरीप पणन हंगाम 2021-22 मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 35 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी प्रदान केली आहे. मंजूर खरेदी केंद्रांपैकी पाच खरेदी केंद्रांनी या कार्यालयाच्या अटी व शर्ती अधीन राहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नसल्याने सदर खरेदी केंद्राना खरेदीचे आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे उर्वरित 30 खरेदी केंद्रावर धानाची खरेदी सुरू आहे. तालुका हद्दीमध्ये कोणत्याही गावातील शेतकरी त्याच्या इच्छेनुसार तालुक्यातील खरेदी केंद्रावर धान विक्री करू शकतो. तसेच शेतकऱ्याने धान विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना त्या धानाची रक्कम देण्यात येत आहे.

तरी, शासन निर्णयानुसार धान खरेदीचा कालावधी दि. 1 ऑक्टोबर 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. ऑनलाईन नोंदणीकृत शेतकऱ्यांनी तालुक्यातील कोणत्याही खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या धानाची विक्री करावी. तसेच ऑनलाईन नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, वोटिंग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्रासह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी व धानाची नियोजित वेळेत विक्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराड़ी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी केले आहे.

हि आहेत तालुकानिहाय खरेदी केंद्रांची यादी:

चंद्रपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर, सावली तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. सावली व व्याहाळ (खुर्द), किसान सहकारी तांदुळ गिरणी व्याहाळ (बुज), सेवा सहकारी संस्था मर्या,पाथरी. सिंदेवाही तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. नवरगाव, नवरगाव सह राईस मिल, नवरगाव, सेवा सहकारी संस्था मर्या. रत्नापूर, सिंदेवाही सह. भात गिरणी संस्था मर्या. सिंदेवाही. नागभीड तालुक्यातील सहकारी खरेदी विक्री संस्था मर्या. नागभीड, सेवा सहकारी संस्था मर्यादित तळोधी (बा.), श्री गुरुदेव सहकारी राईस मिल, कोर्धा. मूल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, मुल व राजोली वि. का.सह. संस्था मर्या. राजोली. चिमूर तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा कृषी औ. संघ मर्या. चिमूर व चिमूर ता. सह.शेतकी ख.वि. संस्था नेरी. बल्लारपूर तालुक्यातील कोरपणा ता.ख.वि. समिती कोरपणा, कोठारी. गोंडपिपरी तालुक्यातील कोरपणा ता.ख.वि. समिती कोरपणा, गोंडपिपरी. पोंभुर्णा तालुक्यातील कोरपना ता.ख.वि. समिती कोरपणा, बोर्डा व कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा. ब्रम्हपुरी तालुक्यातील सेवा सहकारी संस्था पिंपळगाव, आवळगाव, चौगान, अरेर नवरगाव, चंद्रपूर जिल्हा कृषी औ. संघ, ब्रह्मपुरी, सहकारी खरेदी विक्री संस्था ब्रह्मपुरी,चंद्रपूर जिल्हा कृषी औ. संघ, ब्रह्मपुरी बरडकिन्ही, सेवा सहकारी संस्था मराळमेंढा, उदापूर, तोरगाव (खुर्द) या खरेदी केंद्रावर जाऊन धान विक्री करावी, असे कळविण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment