Search This Blog

Thursday 23 December 2021

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Ø विविध विकास कामांचे करणार भूमिपूजन

चंद्रपूर दि.23 डिसेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 25 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता  श्री.संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळाच्यावतीने विठ्ठल रुक्मिणी सभागृह, आरमोरी रोड ब्रह्मपुरी येथे आयोजित तेली समाज वधु-वर परिचय मेळाव्यास उपस्थित. दुपारी 1 वाजता ब्रह्मपुरी येथून राजुराकडे प्रयाण. दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह, राजुरा येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता नगर परिषद राजुराच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता राजुरा येथून चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथे आगमन व रामाळा तलाव परिसर येथे रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण, खोलीकरण कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 5.45 वाजता सेल्स टॅक्स, नवीन इमारतीजवळ दूध डेअरी रोड, चंद्रपूर येथे केंद्रपुरस्कृत संकटग्रस्त महिलांसाठी वन स्टॉप सेंटर इमारत बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. रात्री 8 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment