Search This Blog

Friday 31 December 2021

मदतीसाठी शेतकरी आत्महत्येची पाच प्रकरणे पात्र


 

मदतीसाठी शेतकरी आत्महत्येची पाच प्रकरणे पात्र

Ø अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरांनी घेतला आढावा

चंद्रपूरदि. 31 डिसेंबर : जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण दहा प्रकरणांचा आढावा अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यापैकी पाच प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून तीन अपात्र तर दोन प्रकरणे फेरचौकशीसाठी पाठविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, तहसीलदार यशवंत दाईट, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एम.एन. हेकाड, पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार आदी उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकीकर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 10 प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 5 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली3 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली तर उर्वरित 2 प्रकरणे प्रलंबित ठेवून फेरचौकशी साठी तालुकास्तरीय समितीकडे पाठविण्यात आली.

00000

No comments:

Post a Comment