Search This Blog

Sunday 19 December 2021

23 डिसेंबर रोजी नगरपंचायतीची आरक्षण सोडत

 


23 डिसेंबर रोजी नगरपंचायतीची आरक्षण सोडत

आरक्षण सोडतीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

चंद्रपूर दि.19 डिसेंबर: चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती व सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या ना.मा.प्र. व ना.मा.प्र. महिला ऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या दि.15 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.

त्यानुषंगाने, उपरोक्त नगरपंचायतीची आरक्षण सोडत काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. यामध्ये, सावली नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी वरोरा, पोंभुर्णा साठी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, गोंडपिपरी साठी उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी, कोरपना साठी उपविभागीय अधिकारी राजुरा, जिवतीसाठी अतिरिक्त आयुक्त, चंद्रपूर मनपा आणि सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी चिमूर हे आरक्षण सोडत करीता नेमणूक करण्यात आलेले पीठासीन अधिकारी आहेत.

वरील नगर पंचायतींची आरक्षण सोडत गुरुवार दि. 23 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. यात सावली नगरपंचायतीसाठी सोडत तहसील कार्यालय सावली येथे, पोंभुर्णासाठी नगरपंचायत कार्यालय पोंभुर्णा, गोंडपिंपरीसाठी पंचायत समिती सभागृह गोंडपिपरी, कोरपना साठी नगरपंचायत अभ्यासिका कोरपना, जिवती साठी नगरपंचायत कार्यालय जिवती तर सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीसाठी आरक्षण सोडत पंचायत समिती सभागृह सिंदेवाही या ठिकाणी पार पडणार आहे.

वरीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment