Search This Blog

Friday 10 December 2021

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज आमंत्रित

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर दि. 10 डिसेंबर : सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, सिंदेवाही, राजुरा, ब्रह्मपुरी येथील मुलांचे वसतिगृह तर चंद्रपूर, मुल, बल्लारपूर, चिमूर, ब्रह्मपुरी येथील मुलींच्या वस्तीगृह अशा एकूण 771 रिक्त जागेवरील प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक यांनी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी संपर्क साधून अर्ज प्राप्त करून घ्यावा व सदर अर्ज विहित नमुन्यात भरून गृहपाल यांच्याकडे सादर करावा. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीमध्ये वसतिगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशनकरिता प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य देऊन त्यास तात्काळ त्याच दिवशी वस्तीगृहात प्रवेश देण्यात येईल. असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.

वसतिगृहात ऑफलाइन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी:

शालेय विद्यार्थी, इयत्ता दहावी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून), तसेच बीए, बी.कॉम व बी.एस.सी. अशा 12वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी आणि एम.ए, एम.कॉम आणि एम.एस.सी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर पदवी, पदविका आदी अभ्यासक्रम(व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) दि.4 ऑक्टोबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्ज करू शकतात. तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी दि. 4 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीपर्यंत अर्ज करू शकतात. तरी, विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत आपला अर्ज सादर करावा असे कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment