Search This Blog

Friday 17 December 2021

विभागीय आयुक्तांनी घेतला निवडणूक विषयक आढावा



विभागीय आयुक्तांनी घेतला निवडणूक विषयक आढावा

Ø जिल्ह्यात ऑनलाईन 13776 तर ऑफलाईन 56474 दावे व हरकती प्राप्त

चंद्रपूर दि. 17 डिसेंबर : मतदार यादी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) पल्लवी घाटगे, नायब तहसीलदार सचिन पाटील आदी उपस्थित होते.

1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत प्राप्त दावे व हरकतीबाबत आढावा घेण्यात आला. सदर कालावधीत प्राप्त दावे व हरकती हे दिनांक 20 डिसेंबर 2021 पर्यंत निकाली काढण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

  जिल्ह्यात प्राप्त झालेल्या दावे व हरकतींची संख्या : नमुना - 6 (ऑनलाईन - 9229, ऑफलाईन - 38427), नमुना - 7 (ऑनलाईन-976,ऑफलाईन-10389), नमुना - 8 (ऑनलाईन -2577, ऑफलाईन - 4732), नमुना-8 अ (ऑनलाईन - 994, ऑफलाईन - 2926)

0000000

No comments:

Post a Comment