Search This Blog

Monday 20 December 2021

अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव

 

अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या

वाहनांचा जाहीर लिलाव

Ø लिलावात एकूण 33 वाहनांचा समावेश

चंद्रपूर दि.20 डिसेंबर: तहसील कार्यालय, चंद्रपूर येथील पथकाद्वारे अवैधरीत्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांच्या वाहन मालकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु वाहन मालकांनी त्यांच्यावर ठोठावण्यात आलेली दंडाची रक्कम त्यांना वाजवी संधी देऊनही अद्यापपर्यंत सरकार जमा केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदींना अधीन राहून सदर दंडाची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सदर वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येत आहे,  असे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी कळविले आहे.

सदर वाहन लिलाव दि. 28 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता तहसिल कार्यालय, चंद्रपूर येथे तर 29 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता तलाठी कार्यालय, घुगुस येथे करण्यात येणार आहे.

या लिलावामध्ये जेसीबी-1, ट्रक-1, ट्रॅक्टर-18, तीन चाकी ऑटो-9 व हाफटन-4 असे एकूण 33 वाहने लिलावात काढण्यात येणार आहे. वाहन लिलावाबाबत सविस्तर माहिती तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच इतर सर्व माहिती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे तहसील कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment