Search This Blog

Friday 17 December 2021

21 डिसेंबर रोजी अनुकंपाधारक उमेदवारांसाठी मार्गदर्शन मेळावा


21 डिसेंबर रोजी अनुकंपाधारक उमेदवारांसाठी मार्गदर्शन मेळावा

चंद्रपूर दि. 17 डिसेंबर : जिल्ह्यातील अनुकंपाधारक उमेदवारांसाठी मार्गदर्शन मेळावा 21 डिसेंबर 2021 रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाचे अनुकंपा नियुक्त प्राधिकारी, विभाग प्रमुखांनी अनुकंपाधारक उमेदवारांच्या अद्ययावत तपशीलांसह स्वत: उपस्थित राहावे. तसेच अनुकंपाधारक उमेदवारांनी शैक्षणिक दस्तऐवजासोबत न चुकता उपस्थित राहावे.

अनुकंपा मार्गदर्शन मेळाव्याच्या दिवशी अनुकंपा नियुक्त प्राधिकारी, विभाग प्रमुख व अनुकंपा उमेदवार यांच्याकरीता अधिक माहिती www.chanda.nic.in च्या मुखपृष्ठावर…नवीन…अधिक या शिर्षाखाली उपलब्ध करून देण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment