Search This Blog

Tuesday 14 December 2021

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना


 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना

Ø बेरोजगार युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 14 डिसेंबर : आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे, त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरू करण्यात आले. त्यामार्फत स्वयंरोजगारास इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य करण्यात येते.

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेष करून बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनविणे, योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिक दृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.

आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील 70 युवकांना 3 कोटी 18 लक्ष 81 हजार 200 कर्जाचे वाटप महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

या आहेत योजना:

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-1), गट कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-2) तसेच  गट प्रकल्प कर्ज योजना (जीएल-1).

लाभार्थी पात्रता:  

लाभार्थी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरिता जास्तीत जास्त 50 वर्ष तर महिलांकरिता जास्तीत जास्त 55 वर्ष आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंतच्या मर्यादेत असावे.  लाभार्थ्यांनी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.

आवश्यक कागदपत्रे:

लाभार्थ्यांचे आधार कार्ड (अपडेट मोबाईल क्रमांक व स्वतःच्या ई-मेल आयडीसह), रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला,लाईट बिल, रेशन कार्ड, बँक पासबुक), उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला. व प्रकल्प अहवाल आदी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहील.

येथे करा अर्ज:

लाभार्थी www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात स्वतःचा अर्ज दाखल करू शकतात.

योजनांच्या अधिक माहितीसाठी 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, येथील कार्यालयात प्रत्यक्षपणे संपर्क साधावा. असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अमरीन पठाण यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment