Search This Blog

Thursday 10 June 2021

शेतीवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

 


शेतीवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि.10 जून : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. 18 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत ऑनलाईन  शेतीवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.    

सदर ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये शेतीवर आधारित विविध उद्योग संधी, अन्न प्रक्रियांवर आधारित उद्योग संधी, डिजिटल मार्केटिंग, अॅग्रीकल्चर प्रोडक्ट पॅकेजिंग, दुग्ध व्यवसाय व दुग्ध प्रक्रिया, फळ प्रक्रिया, पशुसंवर्धनावर आधारित उद्योग संधी, उद्योजकता व उद्योजकांचे गुण, उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, संभाषण कौशल्य, संकलन व आकलन कौशल्य, सर्जनशीलता, नाविन्यपूर्तता व समस्या निराकरण, संघटनांचे प्रकार, शासकीय कार्यालयातील विविध योजना, बाजारपेठ पाहणी, साधने व तंत्रज्ञान, उत्पादन निवड, उद्योगासाठी लागणारे परवाने, ना-हरकत प्रमाणपत्र व नोंदणी, जीएसटी नोंदणी, उद्योगाचे व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, उत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापन, उत्पादन नियंत्रण व नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, खेळते भांडवल व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, ऑनलाइन कर्ज प्रक्रिया व कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे इत्यादी विषयांवर ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या ठिकाणी करा अर्ज:

            सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या वेबसाईटवर  दि. 17 जून 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

येथे साधा संपर्क:

            अधिक माहितीसाठी  प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड, दुरध्वनी क्रमांक 07172-274416, 9403078773 व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे 9011667717, लक्ष्मी खोब्रागडे 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment